Tamil Vowel, consonant and Letters

मराठी मुलगा ‘तमिळ’ लिहा-वाचायला कसा शिकतो?

अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट. पहिले २ दिवस इथे आल्यावर जुन्या चेन्नैच्या अनुभवावरून(जून-जुलै,२०१३ इंटर्नशिप) तमिळ कामापुरते अगदी मस्त बोलता येत होते, पण वाचायचे कसे? चेन्नईत सगळीकडे तमिळबरोबर इंग्रजी पाटी अगदी प्रत्येक ठिकाणी असायची. इथे दक्षिण तामिळनाडूत- तिरुनेलवेलीत तसे कुठून असणार?

एखादा अमराठी माणूस मुंबईत मराठी शिकल्यावाचून राहतो, पण दक्षिण महाराष्ट्रात- त्यात कोल्हापुरात आल्यावर काय, त्याला मराठी शिकावे लागणारच!

माझी अवस्था अशीच झाली. कारण दररोज येण्या-जाण्याच्या बसची पाटी वाचता येत नसल्याने अशिक्षितापेक्षा बेकार वेळ आली. कुणाला तरी सतत ‘ही बस अमुक ठिकाणी जाते का?’ असे विचारावे लागे.

पण ‘संकट हीच संधी’ असा विचार करून मी या जिलबी लिपीत उडी मारण्याची तयारी सुरु केली. आधीच द्रविड लिपी देवनागरीपेक्षा अगदीच वेगळी, त्यात काना,मात्रा,अनुस्वार सगळ्याची ठिकाणे वेगळीकडे, शब्दाला वरच्या रेषेने बांधणे नाही, मग काय करायचे!

मी योग्य संधीची वाट पाहत राहिलो.

एका रविवारी(३डिसेंबर,२०१६) वेळ मिळताच माझ्याकडे असलेल्या एका तमिळ शिक्षकाच्या pdf पुस्तकातून(downloaded) त्यांच्या मुळाक्षरांची, ‘१,२,३..’ची आणि ‘अ’,’आ’,’इ’… ची विभागवार मांडणी कागदावर केली (फोटोत पहा) आणि नंतर बाराखडीचा माग काढला.

Tamil Varnmala

अशा प्रकारे अतिशय प्राचीन, संस्कृतपेक्षाही जुन्या अशा तमिळ (होय! संस्कृतपेक्षाही जुन्या) भाषेला जिंकण्याचा प्रारंभ झाला.

‘भाषा सांगलीची, गोष्ट तिरुनेल्वेलीची’ – भाग २