डोळस ‘आंधळं प्रेम’

प्रेम आंधळ असतं पण दोन लोक जेव्हा अंध असतात आणि एकमेकांच्या प्रेमात असतात हे या गाण्यात किती मार्मिकपणे दाखवला आहे हे पाहून डोळ्याची किंमत कळाली. https://www.youtube.com/watch?v=M2QQLRkHSuM प्रतिक्रिया : खरय तुझं, आपण किती धन्यता मानली पाहिजे की आपल्याला सर्व अवयव धडधाकट आहेत🙏🏻🙏🏻 मी : असं म्हणतात की हॉस्पिटलच्या बाजारामध्ये आपल्या शरीराची किंमत जवळपास काही कोटींपेक्षा जास्त … Continue reading डोळस ‘आंधळं प्रेम’

मलयालम (नवयुगी) चित्रपट – एका वाक्यात परिचय

साध्या, एक प्रसंगी कथेत ओतलेला जीव आणि सुंदर कलाकृतीचा नजराणा ! - Thondimuthalum Driksakshiyum (2017) हा चित्रपट सांगलीतल्या शिराळ्यात मस्त रीमेड होऊ शकतो. माझे एक photographer मित्रही आहेत तिथे.(🤪) - Maheshinte Prathikaram मातृसत्ताक पद्धती फिकट होतानाचे केरळ व पितृसत्ताक भारताची छाप गडद होताना दिसते या चित्रपटात मला! - Kumbalangi NIghts (2019) धाडसी पण खिळवून ठेवणारा … Continue reading मलयालम (नवयुगी) चित्रपट – एका वाक्यात परिचय

Mumbai Police (2013)

मुंबई पोलीस ( २०१३) https://en.wikipedia.org/wiki/Mumbai_Police_(film) उत्कंठा शेवटपर्यंत ताणून धरणारा वैचारिक रहस्यपट. सुरुवातीच्या चित्रातच गुन्हा पूर्णपणे सोडवून घरी परतणारा नायक एका छोट्या अपघातात स्मृती गमावतो आणि सुरु होतो विसरलेल्या गुन्ह्याचा, गुन्हेगाराचा पुन्हा एकदा शोध! त्यात नायक(IPS) आपल्याच रोजच्या सवयी ते स्वभाव या स्मृतीभ्रमापायी मागे टाकून आलेला ; अशा त्याच्या या विचित्र विसराळूपणावर मात करत तो (आधीच … Continue reading Mumbai Police (2013)

Ustad Hotel (2012)

उस्ताद हॉटेल (२०१२) खाण्यावर, खिलवण्यावर मनापासून प्रेम करणार एक तरुण शेफ(दुलकुर सलमान), त्याला आपल्या कामावर प्रेम करायला नकळत शिकवणारे त्याचे हॉटेलवाले केरळी आजोबा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या हलक्याफुलक्या चढ-उतारांची ही अप्रतिम कथावस्तू ! कथा थोडक्यात : ४ मुलींवर झालेला मुलगा घेऊन नायकाचे(दुलकुर सलमान) बाबा दुबईला जातात. तिथे लहानाचा मोठा होत असताना बहिणी सासरी जातात आणि … Continue reading Ustad Hotel (2012)

Munnariyippu (२०१३) (अर्थ : धोक्याचा इशारा)

Munnariyippu (२०१३) (अर्थ : धोक्याचा इशारा) मुक्त पत्रकारिता करत असणारी एक मुलगी(अपर्णा गोपीनाथ) एका निवृत्तीला पोचलेल्या जेलरच्या आत्मचरित्रासाठी मदत करण्यासाठी त्याला भेटते. तेव्हाच तिथला एक बुद्धिवादी, दिसायला अतिशय साधा असा एक मध्यमवयीन कैदी(मामुट्टी) तिचे कुतूहल चाळवतो. त्याला भेटल्यानंतर त्याची विचार करण्याची पद्धत, त्याचे पूर्वायुष्य आणि एकंदर त्याच्याबद्दल अनाहूत कुतूहल निर्माण होऊन ती त्याच्यावर एक उत्तम … Continue reading Munnariyippu (२०१३) (अर्थ : धोक्याचा इशारा)

Cineuropa

ही website बऱ्याच जणांना माहिती असेल, तरीही खास करून माझ्या मित्र परिवारातील अनवट चित्रपट दर्शकांसाठी. असे म्हणतात की, ' चित्रपट हा समाज जीवनाचा आरसा असतो.' युरोप आपल्यापासून लांब असला, तरी तिथे समाजात घडणाऱ्या घटना आपल्याला उत्सुकतेचा भाग असतात. अमेरिकेविषयी खूप ऐकतो, पाहतो आपण. मात्र युरोपातील दाटीवाटीने नकाशात बसलेल्या, सुखांत अनुभवणाऱ्या या पहिल्या जगातील लोकांच्या, दिग्दर्शकाच्या … Continue reading Cineuropa

अस्तु , नस्तु !

वेळ सं. ७ ची (१७ जुलै ,२०१६) मी आत्ताच 'अस्तु'चा ६वा.चा शो बघून परत आलो. एकाच तासात कसा काय ? ही एका २ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाची सांगलीसारख्या शहरात परवड! मी एकटाच तिकीट काढणारा पहिला आणि शेवटचा इसम होतो ! वास्तविक तो आज रिलीज झाला.(!) आणि ६.३० पर्यंत 'प्रेक्षकांची' वाट बघून शेवटी तिकीट परत करून … Continue reading अस्तु , नस्तु !

मंडेला (तमिळ;२०२१) हा चित्रपट पाहत असताना केलेली काही निरीक्षणे

प्रसंग व निरीक्षणे : १. मंडेला मागचे दार post ऑफिस साठी शोधतो. २. post ऑफिसची दयनीय बिल्डींग व वाईट अवस्था ३.आधार - मतदान कार्ड - रेशन कार्ड मिळवण्यासाठी मंडेलाला गोल फिरावे लागणे ४. हागण्यापेक्षा मान महत्त्वाचा ! ५. त्याचे (मंडेलाचे) गावाने केलेले नामाभिधान - smile /इरच्च/Bushy Hair/Dung Picker/Rice Sack. मात्र यातील एकही नाव पोस्टात बचत … Continue reading मंडेला (तमिळ;२०२१) हा चित्रपट पाहत असताना केलेली काही निरीक्षणे

बालपणी बघितलेले गाणे आणि त्याचे तरुण डोक्याने केलेले विश्लेषण

https://youtu.be/xaWfJH8fKKk 21 वर्षानंतर पुन्हा बघितलं वरच गाणं. काही गोष्टी आठवल्या यावरून. 1. वाळूतल्या तंबूत बसून बघितलेला, आठवणारा हा पहिला रंगीत सिनेमा. (सोलापुर जिल्ह्यातील एकमेव तंबू चालू असलेलं तालुक्याचं थेटर) 2. गाणं एकदाच रंगीत बघितलं, थेटरात, मग घरी back n white ला छायागीत (रवि,3ते4) आणि मिळाल्यास चित्रहार (बुध,7ते8) कार्यक्रमात त्या वर्षी पुन्हा पुन्हा हावऱ्यासारखं बघितलेले गाणे … Continue reading बालपणी बघितलेले गाणे आणि त्याचे तरुण डोक्याने केलेले विश्लेषण

चार्ली (Charlie) – आयुष्यातला सप्तरंगांचा उत्सव

चार्ली (Charlie)/ malyalam/2015/129min. मार्टिन प्राक्कट या नव्याखुऱ्या दिग्दर्शकाचा हा सिनेमा आपल्याला नव्याने जगायला शिकवतो, आपल्या रोजच्या फिकट जीवनात नवे रंग भरतो आणि आपल्या थकल्या आयुष्यावर आदिम माणसाच्या मुक्त जाणिवेची हळुवार झुळूक सोडतो. मी मल्याळम भाषेत पाहिलेला पहिला चित्रपट हा ! तेव्हापासूनच त्या गोड गुणगुणलेल्या मधाळ भाषेच्या मी प्रेमात पडलो. चार्लीची कथा सुरु होते टेस्सा(पार्वती) पासून ! आपल्या सख्ख्या बहिणीच्या लग्नासाठी बंगलोरहून थेट गबाळ्या  जिप्सी अवतारात उतरलेली ही बिनधास्त पोरटी आपल्या मनात तेव्हाच घर करून बसते. अर्थात मुलगी  असल्याने तिचेही याच मांडवात उरकावे म्हणून आई प्रयत्न करताच ही बिनधास्त पोरगी तिच्यासारख्याच स्वच्छंद मनाच्या आजीच्या संगनमताने आपल्या मैत्रिणीच्या दुसऱ्या शहरातल्या रूमवर रात्रीच ट्रकमधून पसार ! आपणही नकळत तिच्याबरोबर प्रवास करू लागतो. बंगलोरचा जॉब सोडून आलेली, चित्रांमध्ये, नव्या जगण्याच्या शोधातली ही टेस्सा आजच्या तरुणाईच्या मनस्थितीचे तंतोतंत प्रतिनिधित्व करते. ‘आता पुढे काय करायचे हा  प्लानच न करण्याचा तिचा present प्लान’ आपली उत्सुकता वाढवतो. म्युझिक शिकण्यासाठी म्हणून एका गावी तिची मैत्रीण तिला 'उस्मानेक्का' या मध्यस्थाकरवी रूम घेऊन देते आणि सुरु होतो तिच्या आयुष्याची दिशा बदलण्याचा प्रवास ! त्या गावाकडे बोटीतून निघताच तिला तिच्या जणू स्वप्नातलेच रंगीबेरंगी, हसरे, निरागस आणि जगण्याचा भरभरून आनंद घेणारे केरळी अस्सल जग भेटते. टेस्सा आणि ‘ती’ रूम मार्टिनने या चित्रपटात या रूमलाही महत्त्वाचे स्थान दिलेय, ‘ती’ रूमही एक व्यक्तिरेखा आहे. स्वातंत्र्याने, प्रत्येक अंगाने बोलकी आणि चित्रांनी जिवंत असणारी ती रूमच पुढे  टेस्सा आणि नायक चार्ली (दुल्कुर सलमान) यांच्यातला दुवा ठरते. टेस्सा तिथे पोचताच तिथल्या हर स्वभावी लोकांनी आणि ना ना कलात्मकतेने भरलेल्या त्या ‘अतरंगी रूम’नेच  तिचे विश्व व्यापते. ती सुरुवातीला थोडी त्या पसाऱ्यावर चिडते, पण हळूहळू तिला ते सुंदर जग आपल्या कवेत घेते, तीही समरसतेने या रूमचा, त्याच्या मालकाचा त्या जागेतील त्याने केलेल्या लोकांच्या स्केचेसवरून शोध घेऊ लागते आणि तिला  'तो भेटेल का??' या प्रश्नातून आपण नकळत त्या जगात तिच्याबरोबर फिरू लागतो. एका magzine स्केच स्टोरी वरून तिचा त्याच्या शोधासाठी झालेला प्रवास आपल्याला त्या जगात हरवून टाकतो. उसमानेक्का, पथ्रोस, डॉ.कनी आणि सुन्नी नावाचा चोर यांच्या त्याच्याशी झालेल्या भेटी तिला त्याच्यापर्यंत  पोचण्यास उत्सुक करतात आणि तिच्या ‘प्रेमा’च्या भावनेचा सुगंध नकळत चित्रपटात पाझरत राहतो. त्याच्या स्केचेसमधील खऱ्या माणसांना भेटताना तिला त्याचा जगण्याचा एक एक पैलू कळू लागतो आणि तिच्या  जगण्याच्या व्याखेच्या समधर्मी असणार्या त्याचे ‘चित्र’ ती मनात रेखाटू लागते. चार्लीचा हर फ्रेममधला संवाद  जगण्याचे पडलेले आपले प्रश्न सोडवतो आणि नव्या दृष्टीने जगाकडे, स्वतःकडे पाहायला शिकवतो, आपले ‘स्व’ खुबीने राखत इतरांच्या जगात आनंदाची सतरंगी उधळण करायला शिकवतो. दिग्दर्शकाने कथेची गुंफण अतिशय समान गतीने करत तिची शोधयात्रा उलगडली आहे. कॅमेर्याची व तंत्राची  सफाई अकले... हे  गाणे पाहताना बोटीचा दिलेला birds eye view) आणि कमालीचे रंगीत पण भडक नसणारे आणि रंगाची जगण्याच्या अनेकविध पदरांशी तुलना करणारे हे चित्र आहे. केरळच्या सांस्कृतिक रिती,परंपरा आणि सण-उत्सव यांची झलक मोठ्या खुबीने कथेत गुंफत तो चित्रपटाची केरळी छाप तयार करतो.  गोपी सुन्दरची अवीट गोडीची गाणी, विशेषतः स्वतः दुल्कुरने गायलेले ‘चुंदरी पेण्णे’(अर्थ:सुंदर मुली) हे उंच  स्वरातले तिच्या शोधयात्रेला साथ करणारे आणि ‘पुलरीकळो’ (अर्थ: या सुप्रभाती) हे शक्तीश्री गोपालनच्या आवाजातले गाणे अर्थासकट हृदयाला भावते. मात्र चार्ली नेमके जगण्यासाठी काय करतो हा मुलभूत प्रश्न कथेला वास्तवाकडून आभासी गोडगुलाबी categoryत नेतो. बाकी कथा ही acceptable पातळीवर घडते. चार्लीच्या सुहृदांनी त्याच्याविषयी सांगितलेल्या घटनांमधून  आणि त्याच्याशी एकदा नव्हे तर दोनदा झालेल्या  चुकामुकीतून तिची त्याच्याशी भेटीची तीव्र भावना दिग्दर्शक उंचावर नेत राहतो आणि अप्रतिम शेवटाने ती  अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवतो. खरा आनंद आपल्याला तेव्हा होतो आणि एक उत्तम, वेगळा आणि फ्रेश चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळते.    ता.क. या चित्रपटाचा २०१७ ला मराठीत 'देवा-एक अतरंगी' असा पुनर्निर्मित (remake) प्रयत्न झाला, पण मूळ चित्रपटापुढे … Continue reading चार्ली (Charlie) – आयुष्यातला सप्तरंगांचा उत्सव